गेवराईचे ‘पांडित्य’ माजलगाव परळीची निष्ठावान साथ आणि घटक पक्षांच्या एकीने सतीश चव्हाण मारणार विजयाचा चौकार

SHARE:

 

*महायुतीच्या मशागतीने सतीश चव्हाण यांची*
*चौथ्यांदा सुगी*

*गेवराईचे ‘पांडित्य’ माजलगाव परळीची निष्ठावान साथ आणि घटक पक्षांच्या एकीने विजयाचा चौकार होणार सीमापार*

बीड दि.२१(प्रतिनिधी) मराठवाडा पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या बाजूने वातावरण तयार झाले असून त्यांचे पारडे जड आहे. निवडणुकीच्या या पेटलेल्या रानात महायुतीची मशागत नियोजनबद्ध रचनात्मक विजन दर्शविणारी आणि विश्वास देणारी असून याच मशागतीतून उमेदवार सतीश चव्हाण यांना विजयाचे पीक मिळणार असून कुठल्याही परिस्थितीमध्ये ही मशागत सतीश चव्हाण यांच्या विजयाचा चौकार चौथ्यांदा सीमापार करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे, प्रकाश सोळुंके, आमदार भीमराव धोंडे, संजय दौंड, रमेश आडसकर, सुरेश धस, भाजपाचे योगेश क्षीरसागर आदी नेते उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत.

*भाजपाचे डॉ.योगेश क्षीरसागर यांचा सतीश चव्‍हाण यांना पाठींबा*

महायुतीचे उमेदवार सतीश चव्‍हाण यांनी विजयादशमी निमित्त बीड येथे भारतीय जनता पार्टीचे डॉ.योगेश क्षीरसागर यांची भेट घेऊन त्‍यांना दसऱ्याच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्‍या पार्श्वभुमीवर उमेदवार सतीश चव्‍हाण यांनी क्षीरसागर यांची घेतलेली भेट विशेष महत्‍वाची ठरणार आहे. यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सतीश चव्‍हाण यांना जाहिर पाठींबा देऊन एकजुटीने त्‍यांच्‍या विजयासाठी कंबर कसली आहे. दरम्‍यान भाजपाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सतीश चव्‍हाण यांना दिलेल्‍या पाठींब्यामुळे बीड शहरासह तालुका आणि जिल्‍हाभर क्षीरसागर परिवारावर निष्ठा असणारा पदवीधर मतदारांची पहिली पसंती उमेदवार सतीश चव्‍हाण यांना गुलाल लावल्‍याशिवाय राहणार नाही अशी चर्चा या भागात होताना दिसत आहे.

*समता सावता पदवीधरांच्या घरोघरी*

महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सावता परिषदेचे कल्याण आखाडे व त्यांचे पदाधिकारी, समता परिषदेचे सुभाष राऊत आणि त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ओबीसी पदवीधरांमध्ये सातत्याने संपर्क करून फुले- शाहू- आंबेडकर हा विचार सांगून भूलथापांना नकारात्मक प्रचाराला बळी न पडता विकासाचे सातत्य ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण हेच पर्याय असल्याचे सांगत आहेत याचा प्रत्यय निकालात दिसून येण्याची चर्चा सुप्तपणे होत आहे.

*मुस्लिम नेत्यांची निष्ठा पणाला*

बीड नगरपरिषद निवडणुकीमध्ये स्वर्गीय अजित पवार यांनी बीड शहरात दोन सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तन- मन- धन- शक्ती पणाला लावून बीड नगरपालिका शेख मुजिब यांच्यावर विश्वास ठेवून तथा ज्येष्ठ नगरसेवक फारुख पटेल, शेख निजाम, अश्फाक इनामदार, जकी सौदागर, शेख बिलाल, इकबाल भाई आदी मुस्लिम नेत्यांना मानाच्या खुर्च्या मिळवून दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नगरपालिकेत परिवर्तन झाले. आज जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार रणांगणात आहे तेव्हा खुर्चीतल्या या सन्माननीय नेत्यांना आपली निष्ठा सिद्ध करताना महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पसंती क्रमांक एक मिळवून देणार आहे.

*भिमकन्या नगराध्यक्षा पारवे यांची प्रचारात आघाडी*

बीड नगर परिषदेच्‍या नगराध्यक्षा भिमकन्या श्रीमती प्रेमलताताई पारवे यांनी उमेदवार सतीश चव्‍हाण यांच्‍या विजयासाठी प्रचारात आघाडी घेतली असून पदवीधर मतदारांच्‍या गाठीभेटी घेत त्‍यांनी सतीश चव्‍हाण यांना विजयी करण्याचे आवाहन ठिकठिकाणी केले आहे. बीड नगर परिषदेच्‍या निवडणुकीत श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्‍या विजयासाठी उमेदवार सतीश चव्‍हाण यांनी घेतलेले परिश्रम यावेळी फायद्याचे ठरणार आहेत. श्रीमती प्रेमलताताई पारवे यांना प्रशासकीय सेवेचा दांडगाव अनुभव असल्‍यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये त्‍यांचा संपर्क आहे. त्‍यामुळे पदवीधरांचे पहिल्‍या पसंतीचे मतदान सतीश चव्‍हाण यांच्याकडे वळविण्यात श्रीमती पारवे यशस्‍वी ठरणार आहेत.

*अठरा वर्षाचा हिशोबच विजयाचा गुलाल घेणार*
महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सतीश चव्हाण यांनी १८ वर्षात किती लक्षवेधी मांडल्या ? किती प्रश्न सोडवले? त्यांना किती यश आले हे पुराव्यानिशी सांगितले ७८ तालुके असणाऱ्या पदवीधर मतदारसंघात तीन वेळा मतदारांच्या भेटी घेणारे सतीश चव्हाण एकमेव उमेदवार आहेत. या तुलनेत विरोधी उमेदवार अद्याप पूर्ण मतदार संघात पोहोचले देखील नाहीत. त्यामुळे पदवीधरांचा पसंती क्रमांक सतीश चव्हाण यांनाच असेल याबाबत विश्लेषकामध्ये शंका उरलेली नाही.
दरम्यान मराठवाडा विधान परिषदेच्या निवडणुकीच प्रचार अंतिम टप्प्यात असताना संपूर्ण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचेच पारडे जड झाले आहे. पदवीधरांमध्ये सतीश चव्हाण यांच्या बद्दल विश्वास निर्माण झाला आहे, आणि हाच विश्वास सतीश चव्हाण यांना विजयाकडे घेऊन जाणार असल्याचे बोलले जात आहे.

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

Close

शहर चुनें