सतीश चव्हाण हेच पदवीधरांचे पसंतीक्रमांक एकचे उमेदवार! – अमरसिंह पंडित

SHARE:

 

सतीश चव्हाण हेच पदवीधरांचे पसंतीक्रमांक एकचे उमेदवार! – अमरसिंह पंडित

गेवराईतील वकील बांधवांशी संवाद; पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन

गेवराई, दि. २० : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. सतीश भानुदास चव्हाण यांना पदवीधर मतदारांनी पसंतीक्रमांक एकचे मत द्यावे, असे आवाहन माजी मंत्री अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई येथे महाविद्यालयीन पदवीधर तसेच वकील संघातील पदवीधर मतदारांशी संवाद साधताना त्यांनी सतीश चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

माजी आमदार सतीश चव्हाण यांनी मागील तीन कार्यकाळांत पदवीधरांचे नेतृत्व करताना मराठवाड्यातील शैक्षणिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. पदवीधर, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. विधी क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला असून, भविष्यातही ते या प्रश्नांना न्याय देतील, असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला.

नॅशनल लॉ स्कूलसाठी पाठपुरावा, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सहकार्य!

छत्रपती संभाजीनगर येथे नॅशनल लॉ स्कूल मंजूर होण्यासाठी सतीश चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा आणि गेवराईसारख्या भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी केलेले सहकार्य ही त्यांच्या कार्याची ठोस उदाहरणे आहेत. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर त्यांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांच्या कार्याचा लेखाजोखा हेच योग्य उत्तर असल्याचे अमरसिंह पंडित यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित वकील बांधव आणि पदवीधर मतदारांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पदवीधरांचे प्रश्न, शैक्षणिक विकास आणि विधी क्षेत्रातील समस्यांबाबत संवाद साधत सतीश चव्हाण यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.

“पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून सतीश चव्हाण यांना पसंतीक्रमांक एकचे मत देऊन विजयी करा,” असे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले.

या संवाद बैठकीला वकील बांधवांसह पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

Close

शहर चुनें