सुप्रिया सुळे मैदानात; छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी संस्थांना भेटी, पदवीधरांशी संवाद!

SHARE:

 

 

खासदार सुप्रिया सुळे यांचा छत्रपती संभाजीनगरमधील विविध संस्थांना भेटी देत पदवीधरांशी संवाद
प्रतिनिधी /छत्रपती संभाजीनगर :

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध संस्थांना भेटी देऊन संस्थांचे पदाधिकारी, पदवीधर आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
या संवादादरम्यान पदवीधरांच्या विविध समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना केले.
पदवीधर मतदारसंघ हा सुशिक्षित नागरिकांच्या अपेक्षा आणि प्रश्नांना लोकशाहीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा घटक आहे. पदवीधरांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि विविध संस्थांच्या समस्या यांना प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने या संवादाला महत्त्व प्राप्त झाले.
या भेटीदरम्यान माजी मंत्री राजेशभैय्या टोपे, विविध संस्थांचे पदाधिकारी, पदवीधर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटी आणि संवादातून पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पदवीधर मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे.

0
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

Close

शहर चुनें